परकीय जीवसृष्टीशी संवाद साधता येईल का?
‘परकीय जीवसृष्टीशी संवाद साधता येईल काय?’ या विषयावर वेळोवेळी चर्चा होत असते. ‘स्वत:वरून जगाची परीक्षा’ हे सूत्र त्याच्या मुळाशी आहे. आपल्या आकाशगंगेत १०० अब्जांहून जास्त तारे आहेत. त्यांपैकी १० टक्के सूर्यासारखे मानले, तरी आकडा दहा अब्जांच्या घरात जातो. आता अनेक ताऱ्यांभोवती ग्रह (अथवा ग्रहमाला) सापडले आहेत व त्यात पृथ्वीसारखं जीवसृष्टीला पोषक वायुमंडळ, पाणी, प्रकाश आदी असणारे ग्रहही असावेत, असं खगोलशास्त्रज्ञ.......